मोकळा श्वास
मोकळा श्वास
पुन्हा सामोरे तेच प्रश्न, काय मांडावे आज.
परमेश्वरी कृपेने आपोआप, कश्यात दिसेल रूपडे साज.
प्रत्येक ती गोष्ट आहे, मनसोक्त लिहिण्यासारखी.
मांडेल तेवढे कमीच आहे, आयुष्य पुरतील का बारकी.
काय काय म्हणून ते, राहिलंय अजून कागदावर कोरायचं.
कवी मनाच्या शेतकऱ्याला, अजून बरच काही पेरायचं.
सुटेल नक्कीच काहीतरी, भिती थोडी बाळगून.
आनंद आहे तो लुटण्याचा, सुखाचा टाहो फोडून.
काही मिळेल काही सुटेलही, सारा भाग विचारांच्या नशिबाचा.
आपल्या हातात प्रयत्न तेवढे, जमेल तेवढे रस्सी खेचा.
शब्दांसाठी माळी होऊन, बनवेल अलंकारांचे गजरे खास.
मुक्त भावना लिहिल्यावरती, मिळतो वेगळा तो मोकळा श्वास.
