STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

मोह भेटीचा..

मोह भेटीचा..

1 min
27.3K


निशिगंध चोरून नाजूक होऊन फूलराणी बनून ये

पैंजण सोडून अल्लड होऊन रुनझुण मैफिल गाऊन ये

अंबाडा सजवून शृंगार फुलवून दमयंती होऊन ये

ओठांना भिजवून नयनांना मिचकून मृगनयनी बनून ये

गारवा झोंबून पाऊस झेलून वसंत भारून ये

प्रीतीला मोहून भूरळ घालून अप्सरा होऊन ये

धुक्यात नाहून पिसारा नेसून चांदवा पिऊन ये

जराशी मटकून हलकेच लाजून लाजरी होऊन ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance