STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Classics Children

3  

शुभांगी कोतवाल

Abstract Classics Children

मोगरा

मोगरा

1 min
247

रंग त्याचा पांढरा,


पण सुंगांधाचा तो राजा ,


मार्च ते सप्टेंबर ,


भरभरून फुळणारा ,


प्रत्येक जणींचा आवडता ,


असा तो सुंदर मोगरा,


देवाच्या फुलांच्या परडीत ,


टवटवीत व ताजा राहणारा ,


सुंदर स्त्रीच्या वेणीत सजून ,


सौंदर्या ला तजेला देणारा ,


वेगवेगळ्या प्रकारात आढळणारा ,


खूप पाकळ्यांचा जणू गुलाब 


व कमळ फुला सारखा ,


तर जास्त पाकळ्या नसणारा 


पण आकाशाटला तारा ,


थोडा मोठा असा बटमोगरा ,


तर कुठे हजार मोगरा ,


असा किती तरी निरनिराळ्या


आकारात व प्रकारात आढळणारा ,


जणू देवांनी पृथ्वीला दिलेला अनमोल उपहार !


उन्हाळ्यात थंडावा देणारा ,


कधी सुगंधित उदबत्तीत समावणारा , 


तर कधी दर्जेदार परफ्यूम म्हणून 


वापरला जाणारा तो सुगंध .


तर कधी नाजूक गजरा बनून ,


प्रेयसीच्या वेणीत माळला जाणारा ,


किंचित पिवळा व जांभळ्या रंगाची 


छटा असणारा आधुनिक प्रकारचा मोगरा


माझ्या तुमच्या सर्वांच्या आवडीचा व


हवाहवासा आणि मनाला तृप्त करणारा


निसर्गाने आपल्याला दिलेला उपहार !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract