STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

3  

Pavan Pawar

Tragedy

मणुष्यत्व

मणुष्यत्व

1 min
165

मानवी निर्मीतीची साखळी सांगतो गजपूत जगास,

शब्द दुसऱ्याचे असले जरी हे लिखाण माझेच

पृथ्वी निर्मीली ब्रम्हाडांची स्थापना केली दैवाने,

जग चालविण्यासाठी जन्म दिला माझ्या आराध्याने

 

बिज टाकले पाण्यामधी जिवन झाले निर्माण,

मत्स्य अवतार घडला होता त्याच सागरामधी

दिन लोटला , काळ बदलला बिज आले भूमीवर,

कश्यप अवतार असा निर्मला जो राही भू - पाण्यामधी


अंग निघाले, शरीर वाढले तांडव करे किचडात,

वराह अवताराने शक्ती दाखवूनी दिली या जगात

शरीर मानवाचे आले वृत्ती ठरली पशुची,

नरसिंह अवतार घेऊनी वावरी या जगती


जिवन चालत होते समोर मनुष्यत्व मिळाले,

बटुकरूप होते ते शरीर वामन अवताराले

क्रोधी झाला अत्यंत समर्थन करी हिंसाचाराचा,

नात्यांना सोडून त्राही माजवी अवतार परशुरामाचा


वेळेच्या चक्रामध्ये झाला बिजाचा सत्कार,

स्वःताची मर्यादा कळली कळला याला विचार

बौध्दीक क्षमता वाढली यांची सामर्थ मिळाले हत्तीचे,

श्रीराम जन्म आहेत हे प्रतिक मनुष्यत्वाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy