मंजुळ कुंजन करी पाखरे
मंजुळ कुंजन करी पाखरे
मंजुळ कुंजन करी पाखरे
अरुणोदय हा झाला
थव्याथव्यांने घेइ भरारी
वेचुन आला पाला..
निळ्या जळी या वाहे
मस्तीत सुंदर भासे होड्या
यमुने काठी राधेसोबत
कान्हा करतो खोड्या..
हिरवाईने नटूनथटून
उंच कड्यावर डोंगर
तरुवेलीं या मृदगंधाचा
भरे भरारा अंबर..
झुला झुलती राधा राणी
कान्हा संगे वृंदावन
वेडी होई राधा ऐकुन
मोहक बासरीची धून..
आकाशी या इंद्रधनूच्या
छटा विहंगी वारे
प्रियात रमे रंगात भरे
व्याकूळ न्यारे नखरे..
शुभ्र दुधांच्या उंचावरुनी
उडती तुषार धारा
येती मनात असंख्य लहरी
शांतवितो हा वारा..
करे जलक्रिडा कान्हा अन
जळती गोपीका बाला
रास खेळती खट्याळ गोपी
मध्यरात्रीला लीला....

