STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy

मनी उमगेना काय दडले

मनी उमगेना काय दडले

1 min
207

क्षण गोठले उराशी गतजन्माची सल मनाशी

काय शोधते मनी उमगेना काय दडले अंतरी

सोस भावनेसही कळेना उगा छळ हा मनाशी

गुढ अनामिक खुणा ,वाटा काहुरल्या जणू उरी

काय शोधते मनी उमगेना काय दडले भावांतरी

अंथाग सागरडोही खेळी घनमाळा या पापणीशी

आसमानी गुज मनी वादळी घाव झेलते अंतरी

काय शोधते मनी उमगेना काय दडले शब्दांतरी

काल वेगळी ती सावली आज आगळीक क्षणाशी

जग सावरले नयनांती भान मागूनी त्या नभांतरी

काय शोधते मनी उमगेना काय दडले श्वासांतरी

कसे उमजावे भाव मनीचे कसे उमजे गूढ जन्माशी

नितीनियमात राहीली रिती ओंजळ ही हृदयांतरी

काय शोधते मनी उमगेना काय दडले जन्मांतरी

क्षण गोठले उराशी गतजन्माची सल मनाशी

काय शोधते मनी उमगेना काय दडले अंतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance