मंगळसूत्र
मंगळसूत्र
एका धाग्यात
दोनी मन बांधी
आयुष्यास सांधी
काळ्या मन्यात
या वाट्या दोनी
चार मनी सोनेरी
सासर माहेरी
एकी आणुनी
गळा शोभती
खुण ती नात्याची
साक्ष विश्वासाची
सुत्र जपती
विवाहितेचा
मान तो सर्वस्वी
सोबती मनस्वी
पतिव्रतेचा
अमंगल ते
मंगल करीते
सूत्र ते सांगीते
विवाहिते चे
दोन जीवाची
साथ ही जन्माची
बंध रेशमाची
कथा सुत्राची
स्त्रीचा आदर
हळ्दीकुंकू दान
मंगळसूत्रान
जपी पदर
काळे हे मणी
धन्यास जपती
नजर काढती
काळा रोखुनी
