मंगळसूत्र
मंगळसूत्र
माझं आयुष्य तसं
कष्टात भिजलेलं आणि थिजलेलं
तुझं मंगळसूत्र गळ्यात
बांधण्याचे स्वप्न उरात घेऊन
नव्या उमेदीनेे जगू पाहतेय
तसं प्रेमाला वय, जात;
गरीब ;श्रीमंत याचं
घेणं देणं नसतच मुळी.
मी डोळ्यात मधाळ स्वप्नं घेऊन तुझ्याच वाटेवर चालत आहे...
तुझे कणखर बाहू सांभाळतील
याचा मला विश्वास वाटतोय.
की आरसपाणी सौंदर्याची
मनाला भुरळ पड़ली
काय खरं ते निट सांग.
माझ्या फूटक्या नशिबात
पुन्हा दुःखाची छिद्रं नकोत,
लाख लाख चाँदण्या
उद्या अंगणात प्रकाशित होतील.
त्याला साक्षी ठेवून जगायचे की
बंधनंआणि अपेक्षांखाली
जीवन घालवायचं?
तू त्या थडिला मी या तिरावर
तरी लांबुनच दिसत,हसत रहावं.
भीती नको सोडून जाण्याची की,
व्याकुळ होऊन
दुराव्याची भितीही नको.
चरित्र; शिल सांभाळून
एकमेकांना जपता येते
हे दाखवून देऊ
या डिजिटल युगात सत्यता आहे त्यावरच जग सुरु आहे
कोणीही जन्मता गुंड.फसवा नसतो
तर वेळ ,काळ,आणि
आपल्या रक्ताच्या नात्यांचे असते काही अनामिक स्वप्न आकांशा.
आपल्याला ते करण्यास भाग पाडते जे करायचे नसते.
पण!आपलं जगणं आपलंच असावं या मताची मी
सर्वांना सोबत घेऊन चालते
सर्व आयुष्य तुझ्या पणाला लावून
मंगळ सूत्राचे पावित्र्य जपावे
आपली संस्कृती ,विश्वास
त्यात घट्ट होतो...
काळपरत्वे नाते मजबूत होत जाते !!
