मनातला पाऊस
मनातला पाऊस
क्षितिजाकाठी दिसता
खिडकीशी थबकतो
निळ्याभोर अंबरी मी
निळ्या घनांना पाहतो ||१||
पावसाच्या दूतांकडे
मी करतो विनवणी
घेत नाही आढेवेढे
कोसळतो या अंगणी ||२||
मनातील हेवेदावे
गेले सोबत वाहूनी
बरसला पाऊस हा
चिंब झालो मनोमनी ||३||
मनातल्या पावसात
झाली तुझी माझी भेट
कधी येशील भेटाया
समोरासमोर थेट ||४||
रंगलो या पावसात
मी तुझ्या सोबतीने
गाणे गाऊ पावसाचे
राहू गुण्यागोविंदाने ||५||