मनाशी संवाद
मनाशी संवाद
अरे मना, तुला पण वाटतं असेल ना
साथ तुला कोणाची तरी हवी
अरे मना, तुला वाटत ना
तुझ्या डोळ्यातील आसवं कोणीतरी पुसावी
अरे मना, तुला पण वाटतं ना
स्वप्नातल्या सख्याला आयुष्याची साथ लाभावी
अरे मना, तुला पण वाटतं ना,
तुझ्या आठवणींना कोणाची तरी आठवण यावी
अरे मना, तुला पण वाटतं ना
आयुष्यात चाललेल्या वादाला कोणीतरी मिटवावं
अरे मना, खरंच तुला वाटतं ना,
तुलापण एकट्यात रडावंसं वाटतं
