STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

मनाचं गुपित

मनाचं गुपित

1 min
170

ऐक गडे सांगतोय

माझ्या मनाचं गुपित

सूर जुळले आपले

मन आपले जपीत


सूर जुळता जीवनी

गोड वाटे हुरहूर

गोडी गुलाबी पाहुनी

दाटे मनी हो काहूर


भेट आपली पहिली

आठवणीत राहिली

नजरेने केली जादू

मना चाहूल लागली


ध्यास तुझा नेहमीच

अंतरात हितगुज

करी,राही आठवण

तुझी मनी अलगूज


कळणार कधी तुला

भाव माझ्या अंतरीचा

गुज तुझे माझे सखे

हवा संवाद प्रेमाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance