STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Fantasy Others

3  

Urmi Hemashree Gharat

Fantasy Others

मन.....

मन.....

1 min
1.2K


तु समोर येता

होई मन अधीर

आठवण तुझी येता

होई ऊगीच सैरभैर


मन लहरी स्वरांकित

गुज गाती नात्याचे

नित डोऴ्यापुढे नाचती

क्षण बेधुंद रेशमाचे


मन साद घाली तुजला

सांगे मिठित घे ना

ओढ तुझ्या प्रीतीची

करी बैचेन माझ्या मनाला


मन माझे मलाच न कऴले

जे नकळत तुझ्यावर जडले

अधीर होऊनी नव्याने

तुजपाशीच येऊन थांबले

अधीर होऊनी नव्याने

तुजपाशीच येऊन थांबले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy