मन पाऊस पाऊस झाले
मन पाऊस पाऊस झाले
मन पाऊस पाऊस झाले
मन पाऊस पाऊस झाले
खुळ्या आभाळाची
साद धरणीला
चिंब न्हाऊन न्हाऊन गेले.....॥धृ॥
स्पंदने जागता अंतरीची प्रिया
प्रेम गंधात गंधुन गेले
क्षण आसुसले रे तुझ्या मिलना
खुळ जिवास लागुन गेले.....
ओल्या स्पर्शातुनी
चिंब देहावरी
प्रेम कोरुन कोरुन गेले.....
मन पाऊस पाऊस झाले......॥१॥
तुझ्या माझ्या ओठांतुन
तुझ्या माझ्या ओठांवरी
पावसाची सर वेडी
बरसाया आतुरली
सख्यासवे धुंद धुद झेलुनी
मन थेंबात वाहूनी गेले
तुझ्या श्वासांतुनी
माझ्या श्वासांसवे
जिव जोडून जोडून गेले
मन पाऊस पाऊस झाले......॥२॥