STORYMIRROR

somadatta kulkarni

Classics

4  

somadatta kulkarni

Classics

मन मंदिरात माझ्या

मन मंदिरात माझ्या

1 min
504

मन मंदिरात माझ्या

रूप तुझेच विठ्ठला

सावळे रूप सुंदर

शोभे कटिसी मेखला  १


सम चरण साजिरे

कटेवरी हात शोभे

रूप मनोहर तुझे

विटेवरी आहे उभे   २


मन मंदिरात माझ्या

पुजा तुझीच करतो

तुझ्या नावाची विठ्ठला

माळा गळ्यात घालतो.  ३


वारकरी आहे खरा

वारी तुझी मी करतो

रामकृष्ण हरि जप

हृदयात उमटतो      ४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics