मन झुरणी लागले
मन झुरणी लागले
निम्मीत्त मात्र ठरले आता
क्षणात गोठणे मज शक्य नाही
विस्तवाची काय बाळगू तमा आता ....
विझणे असे जीवाला मान्य नाही
गत काळाच्या गर्तेत झुरते मनी जे
ती सल नेत्री मी उगाळत नाही आता ....
रात्र एकली सोबती नांदते इथे
भय संकटाचे काय मानू आता .....
निशब्द होणे नशिबी लिहुनी आले
ठोके ते हृदयी चे का मोजू आता ......
मनाशीच तुटले जे नाते माझे
नाती गोती ती का सांभाळू आता....
मरणासन्न झाली स्वप्ने नेत्रीचीच
श्वास तयात आणू कुठून आता ....
असे कीतिदा मेले न उठुन रखेतुनी जगले
परतुनी तिच मी कशी होईल आता ...
गुरफटणे नात्यात आता शक्य नाही
सततचे स्वत:स सतावणे शक्य नाही आता ...
