STORYMIRROR

Pradnya Ghodke

Classics

4  

Pradnya Ghodke

Classics

मन घाली गवसणी

मन घाली गवसणी

1 min
1


मनाच्या स्पंदनात 

अनामिक हुरहुर असते

दूर पळते

शांती... 


काळासोबत धावणे

जमेल का विचारते

सदैव करते

मंथन... 


मनातील माती

सृजनतेला जणू जोपासते

कणोकणी वसते

ओलाव्याने... 


भावबंध जोडताना

मन घाली गवसणी

विश्वास क्षणोक्षणी

जपून... 


देहात शांती

आणि शीतलता नांदविते

जणू विलसते

समाधान...


                सौ. प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

'अंतरीच्या खोल डोही' तून....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics