आरसा कविमनाचा
आरसा कविमनाचा
भासे ताटवा
जणू उमलत्या फुलांचा
आरसा कवीमनाचा
नितळ...!
कधी डोलतो
आतल्या स्वत:च्या सुखाने
भाळलेल्या मुखाने
अलवार...!
किती शब्दकोषात
शोधत स्वतःला बसतो
तरी देतो
उधळून...!
पाहत बसतो
असे धुंद धुंदीत
मस्त मस्तीत
राहतो...!
जगतो असे
नित्य स्वत:ला झोकून
येता तुफान
वाकतोही...!
नसतो कसलाही
त्याला कुठलाही गर्व
जगण्याचे पर्व
स्वच्छंदी...!
अशी शब्दसुमने
दाखवतो आरसा कवीमनाचा
असा परिमळांचा
वारसा...!
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
