STORYMIRROR

Shreyash Shingre

Inspirational

3  

Shreyash Shingre

Inspirational

मला स्वातंत्र्य हवंय

मला स्वातंत्र्य हवंय

1 min
766


मला स्वातंत्र्य हवंय

शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून

त्यांना वेळोवेळी फसवणाऱ्या

सावकारी जाचापासून


मला स्वातंत्र्य हवंय

अंधश्रद्धेसारख्या भयाणकतेपासून

भोळ्या भाबड्या लोकांना लुटणाऱ्या

तांत्रिक-मांत्रिक बाबांपासून


मला स्वातंत्र्य हवंय

लाच घेणाऱ्या लाचखोरांपासून

आपल्या हव्यासापोटी

त्यांना लाच देणाऱ्यांपासून


मला स्वातंत्र्य हवंय

स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायापासून

त्यांना कमी समजणाऱ्या

प्रत्येक जुलमी व्यक्तीपासून


आणि होय मला हवंय स्वातंत्र्य

प्रत्येक वाईट गोष्टींपासून

देशात घडणाऱ्या प्रत्येक

अकथित अन्यायापासून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational