STORYMIRROR

Kamlesh Sonkusale

Inspirational

4  

Kamlesh Sonkusale

Inspirational

मला कळले नसते

मला कळले नसते

1 min
26.7K


तू जर माझ्याशी प्रेम करून

त्या प्रेमाला नाकारले नसते

तर,

अबोल पक्ष्यांना वेदना असतात

हे सुद्धा, मला कळले नसते


तू जर प्रेमाचे जाळे फेकून

हृदयाच्या चिंध्या केल्या नसत्या

तर,

कळ्या-फुलांना काळीज असते

हे सुद्धा, मला कळले नसते


तू जर प्रेमाच्या मोहात पाडून

मला दूर सारले नसते

तर,

प्रेमामध्ये विरह असतो

हे सुद्धा, मला कळले नसते


तू जर माझे काळीज व्यापून

ते रिकामे केले नसते

तर,

हि कविता जन्मास येईल

हे सुद्धा, मला कळले नसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational