STORYMIRROR

Ajay Nannar

Abstract Inspirational Others

3  

Ajay Nannar

Abstract Inspirational Others

मकरसंक्रांत 2021

मकरसंक्रांत 2021

1 min
417

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा 

रंग उडत्या पतंगाचा 

बंध दाटत्या नात्यांचा.. 


सण संक्रांतीचा हा 

दिन रात्र जेथे समान ....

ठेऊनी संस्कृतीचे भान 

करुया सर्वांचा मान...


घे भरारी पतंगासव,

बहरु दे तुझे मन,

विसर दुःख तू सारे सारे

फुलु दे तुझा प्रत्येक क्षण... 


उंच नभी उडता पतंग 

संथ हवेचा त्याला संग 

मैत्रीचा हा नाजूक बंध 

राहो नाते आपले अखंड.. 


जसे तीळ आणि गुळ 

तसेच तू आणि मी 

येऊन एकत्र, 

विसरु सारे बहाणे,

गाऊ मधुर जीवन गाणे...


विसरुनी सर्व कटुता

ह्रदयात... 

तिळगुळाचा गोडवा यावा...

दुःखे हरावी सारी, 

अन् आयुष्य

सुखाचा सोहळा व्हावा...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract