STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

2  

Manisha Awekar

Classics

मजेशीर पाऊस

मजेशीर पाऊस

1 min
301

आई मला पावसात

खूप खेळायचे आहे

मला होड्यांच्या खेळात

खूप रमायचे आहे


नको शाळेला पाठवू

दांडी मस्तपैकी मारु

छान वाटे मला खेळू

नको हाका मला मारु


मस्त नेसकॉफी कर

गरमागरम भजी कर

मित्र खेळाया तत्पर

चल फोन दे सत्वर


उन्हं कोवळे सुंदर

छान पडलंय आई

इंद्रधनुष्याचे रंग

नभी खुलतात बाई


किती मस्त हा श्रावण

खूप सुट्टया असतात

फुललेला हा निसर्ग 

वृत्ती उमलवतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics