मिठी विश्वासाची
मिठी विश्वासाची
स्पर्श तुझा मज जाणवतो आधाराचा जेव्हा
अलवार तू मज घेतोस मिठीत
गंध तुझ्या प्रितीचा हर्षवितो मजला अन्
तना मनाने मी होते रोमांचित सखया....!
अधरांच्या स्पंदनाने शब्द न उमटती ओठी
धडधड हृदयाची घेऊन जाते
मज थेट ती स्वर्गात.......!
मिठी विश्वासाची मज हवी हवीशी वाटते
तू दूर असलास तरी भास मला तो बेधुंद करून सोडतो......!
वचन दिलेले विश्वासाच्या मिठीने पाळले आपल्या दोघांच्या लग्न गठबंधनाने.
सप्तपदी चालुनी घेतली शपथ एकमेकां सोबत राहायची.
मिठी विश्वासाची आनंदी जीवन माझे करून राहिली.
संसाररूपी तो स्वर्ग अवतरला माझ्या सदनी
धन्य धन्य मी झाले या जगती...

