मित्रत्व ,,,,!
मित्रत्व ,,,,!
दसरा मिलन अन् मैत्रीदिनाला
माझा 'मित्र' हा जीवाभावाचा असतो
हे दोन दिवस सोडले तर
माझा मित्र कुठे असतो
आम्हाला स्वार्थाची - स्वत्वाची धुंदी
फार चढली आहे
मैत्रिदिना पुरतीच
मित्राशी बांधिलकी उरली आहे
दसरा तसेच मैत्रिदिनाला मित्राची
आम्हा फारच काळजी वाटते,
दोस्तीच्या गाण्यावरही काळजी
दारू पिऊन पचवली जाते
मित्र - मैत्रिणीशी आम्हाला
काहीच घेणे - देणे नाही
स्वार्थ - स्वहिताशी मतलब आमचा
कधी डोळे उघडून बघणे नाही
'हॅप्पी फ्रेंडशिप डे' म्हणण्यापुरताच
मैत्रिदिन उरला आहे
मित्रत्वाचा स्नेह हा
आजचा समाज पार विसरला आहे
