STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Inspirational Others

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Inspirational Others

"मित्रांचा चहा" (प्रतिभाग्रज)

"मित्रांचा चहा" (प्रतिभाग्रज)

1 min
296

जमले मित्र

चारच खास

डोंगरदर्या

करी प्रवास


थंड गारवा

मंद मारवा

पहाटवेळी

ऋतू बरवा


झाली चहाची 

तल्लफ त्यांस

साहित्य त्याचे

होतेच खास


चूल किटली

पुन्हा भेटली

सुकी बाभूळ

ज्वाळा पेटली


चहा साखर

दूध निरस

आलं वेलची

थोडी टाकली


आग सोनेरी

वाफ रूपेरी

गंध चहाचा

भरे अंतरी


झाला तयार

फक्कड चहा

अमृततुल्य

पिऊन पहा


आली परत

ती तरतरी

मित्र तयार

करण्या स्वारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational