#मित्र
#मित्र
घेऊन हातात हात
देई संकटात साथ
माझा सखा सोबती
होई जेव्हा भावाचा...
लागता ठेच पायाला
पहिले दुःख होई त्याला
बांधत लेप मलमपट्टीचा..
घेई मनातले जाणून
उपाय शोधे शंभराहून
ठेवा आहे आनंदाचा..
उरी पेटता वनवा
घेई सत्वर तो धावा
शिडकाव करी प्रेमाचा ....
नसे शंकेला वाव
लागेना मनाचा ठाव
जसा भाऊराया पाठचा..
नात्यापेक्षाही मोठे
बोलले जरी काही खोटे
चिमटा काढी हळूच कानाचा...