STORYMIRROR

Nishikant Deshpande

Classics

4  

Nishikant Deshpande

Classics

का तेच झाले?

का तेच झाले?

1 min
201


शेवटी होऊ नये का तेच झाले ?

गारदी देण्यास खांदा फक्त आले


चेहर्‍याच्या आड मी डोकावलो न

वाटले जे आपुले, परके निघाले


फक्त सदरे घातल्याने माणसांचे

मान मिळतो, श्वापदांना हे कळाले


शांतता समितीवरी अध्यक्ष केले

नेमके दंग्यात ज्याचे घर जळाले


राष्ट्रद्रोही अन् जिहाद्यांचाच पुळका

अन् हुतात्मे विस्मृतीमध्ये बुडाले


पाहिला पोलीसखाक्या अन् दरारा

गुंड त्यांचे दोस्त, पीडित धुम पळाले


लोकशाही भोगली मनसोक्त लुटली

लूट घेउन सभ्य स्वीडनला उडाले


प्यायला पाणी नसे, हाती जनांच्या

घोषणांनी फक्त भरले रिक्त प्याले


चांगल्या "निशिकांत" गोष्टी सांगता मी

का मला सारेच बुरसटला म्हणाले?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics