STORYMIRROR

Pandit Warade

Classics

3  

Pandit Warade

Classics

श्रीकृष्ण अवतार कार्य

श्रीकृष्ण अवतार कार्य

1 min
28.9K


जगी जेधवा धर्म ग्लानीस येतो

कृपाळू प्रभू त्या क्षणी जन्म घेतो

जगा देत संदेश जन्मास आला

नमस्कार माझा तया नंदलाला।।१।।


क्षणी ऊन येते, क्षणी पावसाळा

अशा श्रावणी वद्य त्या अष्टमीला

जगत्चालकाचा इथे जन्म झाला

नमस्कार माझा तया नंदलाला।।२।।


नभी मेघ, वीजा भिती दावताती

तुरुंगातल्या वादळी काळ राती

खुशी देवकीला नि साऱ्या जगाला

नमस्कार माझा तया नंदलाला।।३।।


करी गोपिकांच्या सवे रास लीला

सखे सोबती गोप खेळावयाला

दही दूध लोण्यात गोपाळकाला

नमस्कार माझा तया नंदलाला।।४।।


जरी कंस मामा तरी ठार केला

यमाच्या घरी धाडिले पूतनेला

वधीले शिशूपाल, चाणूर मल्ला

नमस्कार माझा तया नंदलाला।।५।।


सखा पांडवांना खरा जो मिळाला

जगी सत्य तो धर्म सांभाळ केला

दिला ग्रंथ गीता जगी मानवाला

नमस्कार माझा तया नंदलाला।।६।।


महाभारताच्या रणी भाग त्याचा

बने सारथी तो सखा अर्जुनाचा

खरी राजनीती कळाली जगाला

नमस्कार माझा तया नंदलाला।।७।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics