STORYMIRROR

Shila Ambhure

Classics

3  

Shila Ambhure

Classics

बापाची माया

बापाची माया

1 min
31.1K


सारे वर्णिती आईची वेडी माया

तरी बाप असे कुटुंबाचा पाया


माया बापाची जणू नारळ खरे

राग जरी वर आत प्रेम झरे


घरासाठी बाप राबे दिनरात

देह झिजे त्याचा जळे जशी वात


ढाल बनुनी बाप उभा दारात

धजे ना कोणी उगा येण्या घरात


माया बापाची असे कस्तुरीपरी

दिसे न वरून जाणावी अंतरी


उलटेल जेव्हा वडिलांची साठी

बना तुम्ही त्यांच्या आधाराची काठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics