मीच माझ्यात गुंतत जातो
मीच माझ्यात गुंतत जातो
मीच माझ्यात गुंतत जातो,
मग एखादी कविता लिहीतो,
लिहीताना तुझ्या आठवणीत,
शब्दाचा मग घोळ होतो,
तुझा चेहरा बघताच मग,
आठवणींचा मेळ होतो,
शब्दांना मग पाझर फुटतो,
कवितेचा मग पूर येतो,
कवितेमध्ये तुला पाहतो,
मीच माझ्यात गुंतत जातो.....

