मी
मी
कित्येकदा मी स्वतःला
समजावले होते
तरी मन पतंग दिव्यावरी
झेपावले होते.
नशा बंडखोरीची ही
जीवघेणी खरी
परिणामही मुक्याने मी
स्वीकारले होते.
वाटेत भेटलो असा
सुखाला मी
त्यासही कोणी असे
भेटले नव्हते.
ठाऊक कुणाला इथे
इशारे प्राक्तनाचे
सुखाच्या सीमेवरी दुःख
उभे होते.
मीही गेलो सामोरा
दुःखाच्या स्वागताला
दुःखातही सुखाचे माझ्या
पाश होते.
