तुझी आठवण
तुझी आठवण
1 min
27.6K
तुझी आठवण
कधी नाजूक दव
तुझी आठवण
कधी सरींचे तांडव
तुझी आठवण
कधी तोल सावरते
तुझी आठवण
कधी बेभान बागडते
तुझी आठवणी
माझे भिजलेले रान
तुझी आठवण
माझे घायाळ मन
तुझी आठवण
नियम ना कायदा
तुझी आठवण
फिरून भेटायचा वायदा
