केव्हा तरी
केव्हा तरी
केव्हा तरी गाव माझे
तुझ्या चांदण्यांनी उजळले होते.
केव्हा तरी स्वप्नात माझ्या
रंग इंद्रधनुचे मिसळले होते
केव्हा तरी हृदय माझे
तुझ्या सुरांवर थिरकले होते
केव्हा तरी श्वास तुझे
प्राजक्त होऊन दरवळले होते
केव्हा तरी मन माझे
फुलपाखरू होऊन भिरभिरले होते.
केव्हा तरी वाळवंटात माझ्या
मृगजळ जणू अवतरले होते

