STORYMIRROR

ninad rajpathak

Romance

3  

ninad rajpathak

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
43

जेव्हा नभ मेघांनी दाटून येते 

अन् सौदामिनी ती लखलखून जाते 

मला सखे तुझी याद येते


कोसळत्या सरींनी धरा चिंब होते 

झुळूक, मातीचा सुगंध घेऊन येते 

मला सखे तुझी याद येते


जेव्हा गर्दीत भास होतात एकटेपणाचे 

अन् मनाची तेव्हा उलघाल होते 

मला सखे तुझी याद येते


जेव्हा चांदण्यांनी आकाश भरून जाते

दरवळत्या रातराणीचे ही निमित्त होते

मला सखे तुझी याद येते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance