STORYMIRROR

Neha Khedkar

Romance

3  

Neha Khedkar

Romance

मी वाट पाहतोय..!

मी वाट पाहतोय..!

1 min
12.7K

खरंच इतकं कमकुवत होतं का माझं प्रेम

भावनांचा गुंता सोडवण्यासाठी 

नाही आली परत फिरून...

तुझा घट्ट धरलेला हात

काळजात अडकलेला श्वास 

सोडविण्याची इच्छा नाही...??

तू आयुष्यात पहिल्यांदाच आली तेव्हा

जगण्याची दिशाच बदलली..


तासन तास आपण मारलेल्या गप्पांच्या ओघात

तुझ्यावर किती तरी प्रेम गीत लिहिली...

तुझा हात, हातात घेत 

पावसात चिंब सरीमध्ये

मला भिजायला खूप आवडायचं..

प्रेमात पडले की 

माणूस त्याचाच नसतो.

तसा मी ही तुझ्यात पार विरून गेलो होतो...


प्रेमाचा पसारा आणि मायेचा विसावा..

सारखं,योग्य तू सुद्धा मला तुझ्या प्रेमनगरीत 

हातात हात घालून 7गावभर फुरविले ...

छाती ठोक पणे सगळ्यांसोबत असूनही

आपलं वेगळं विश्व होत...

सगळ्यांची नजर चुकवून 

एकमेकांच्या नजरेत हळूच बघत होते... 


रात्र आणि दिवस जणू

तू माझा आणि मी तुझी

असं धडधडनारे ऊर

कायमच सांगत होते...!

कुठे आहे कोण आहे..आजू-बाजू

दुनिया भुलवून जातो मला..

काही कक्षणात सगळं आर पार झालं ...


माझ्या हातून नकळत घडलेली चूक ..

नात्याला आपल्या तिने भेदला अचूक ...

लाख विनवणी करुनही

तू परत फिरली नाही...

तुझा राग आणि संताप

आपल्याला अजूनही दूर ढकलत आहे...


तुझ्याचसाठी जगणाऱ्या या जीवाला जगवत

तुझी वाट कायम पाहतोय...

कधीतरी भेटशील ना..!

वाटत असेल तुला असे तर..

सांग मला कधीतरी…

खरच आयुष्यभर..

थांबेल मी तुझ्यासाठी…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance