STORYMIRROR

Suvarna Patukale

Tragedy

3  

Suvarna Patukale

Tragedy

मी उरले

मी उरले

1 min
189

फूल जसे वासाविना, तरुवर पाण्याविना

मी उरले, उरले मी जसा देह प्राणाविना


का बहरावीण, हे ऋतू गेले

आले सरले मास किती

का चमचमते, तुटले तारे

आत कोंडले श्वास किती?

सल सलते, जखमा भळभळत्या

गोठून गेल्या पुन्हा

मी उरले, उरले मी जसा देह प्राणाविना


का परतीची वाट नसावी

वादळ करते घात किती

का समईची ज्योत रुसावी

झुरत रहावी वात किती

थरथरती लाटा त्या विरती

काठ शोधे कुणा?

मी उरले, उरले मी जसा देह प्राणाविना


का वाटेवर तनमन हरले

त्यावर हे आघात किती

का वळणावर सुटले धागे

फुटले मोती त्यात किती

प्रश्न करी हृदयास वेदना

काय होता गुन्हा?

मी उरले, उरले मी जसा देह प्राणाविना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy