मी तुझा, तू माझी
मी तुझा, तू माझी
पाहता डोळे तुझे, कळले मलाही
किती प्रेम आहे तुझे माझ्यावरी....
मी तुझा, तु माझी
हृदयात जे आहेे तुझ्या
येऊ दे ओठावरी,
झाले जे काही
तुझ्या माझ्या हृदयी
कळू दे मला थोड़े तरि
मनाला माझ्या कळलेच नाही
झाले हे तुझेच कधी
मनाला तुझ्या कळू दे हे थोड़े तरि
हृदय माझे आले किती बहरुनी
कसे काय सांगावे तुला कळेनाच काही
मी तुझा, तु माझी
पाहता डोळे तुझे, कळले मलाही

