मी टू
मी टू
मी टू वादळ
चांगलचं उठलयं
पुरुषातील विकृतीला
त्यानं रस्त्यात गाठलयं
एखाद्याच्या परिस्थितीचा
पुरेपुर घेऊन फायदा
केला जातो तिच्यांशी
स्वप्नपूर्तीचा वायदा
पांढरे वस्त्र परीधान करणारे
सगळेचं नसतात बगळे
अहंकाराच्या धुंदीत चालतात
अनेक खेळ विचित्र वेगळे
स्त्री- पुरुष समानतेचा
नुसताच गाजावाजा
अनेकांना मिळते
वासनारुपाने सजा
प्रत्येक गोष्टीचा
शेवटी असतो अंत
इतक्या सहज का
कोण मी टू म्हणतं?
मी टू या वादळाने
वासनेची विकृती
होईल वाटतयं उध्ववस्त
अशा मनी आहे
होईल स्त्री अत्याचाराचा अस्त
