मी स्त्री
मी स्त्री
अनेक संकट आली तरी
मागे नाही हटली,
अनेक अपयश आले तरी
थकले नाही कधीच,
अनेक लोक बोलले तरी
विचार नाही बदलले ,
अनेक वेळा पडले तरी
पुन्हा नव्याने उठले,
अनेक अडचणी आल्या तरी
पुन्हा शुन्यापासुन सुरुवात केली,
अशी माझी प्रेरणा मीच स्वतः होती,
दुसऱ्यावर अवलंबून न राहता
स्वतः स्वतःसाठी लढले...
