मी सैनिक झाले तर
मी सैनिक झाले तर
लहानपणापासूनच माझे स्वप्न होते
मी जीवनात कधीतरी देशाचे सैनिक
बनावे देशासाठी झीजावे जगावे मरावे
माझी इच्छा पूर्ण झाली मी सैनिक बनले
लढणार आहे मी बघा सत्यासाठी
भारत मातेच्याच हो रक्षणासाठी
बलिदान देऊन मी प्रेरणा बनणार आहे
भारत मातेच्या प्रत्येक लेकरांसाठी
करीन हिमतीने निष्ठुर त्या शत्रूचा अस्त
त्यांचे आराखडे करून टाकीन उध्वस्त
स्वौरक्षन करीन भारताचे जीवनाचा करून अस्तं
भारत मातेला होऊ देणार नाही मी अस्तव्यस्त
करणार नाही मी माझ्या जीवाची पर्वा
वैऱ्याचा करून टाकी मी एका झटक्यात चुरा
ऊंचा विनी भारत मातेच्या झेंड्याचा तुरा
मला म्हणतील सर्वजण भारतमातेचा सैनिक खरा
मी गुरफटलो आहे हे माझ्या भारत मातेच्या बंधनात
भारतावर संकट असताना कसा झोप घेईन मी निवांत
जींकविनच भारतमातेला असा आहे मी किर्तीवंत
भारतमाता कालही आजही उद्याही राहणार यशवंत.
