'मी'पणा मावळत्याचा
'मी'पणा मावळत्याचा


रंगांची उधळण काही थांबेना,
नितळ जलछवीचा मोह मात्र आवरेना,
धरेवरील स्वप्रबलता त्याची काही सोडवेना,
छाप पाडण्यास मन काही भरेना,
मावळतीच्या सूर्याचा थाट काही रूसेना,
आणि कोवळ्या किरणाला क्षितिज काही गवसेना,
कोवळे अश्रू आटले परी मन काही विझेना,
प्रयत्नपथास कोवळ्या यश काही मिळेना,
भरारी घेण्यास त्यास पंख काही सापडेना,
आणि दशदिशांतली निराशा काही संपेना,
मावळतीच्या सूर्याचा थाट कही रूसेना,
कोवळ्या किरणाला क्षितिज काही गवसेना