थोर तुझे आईपण
थोर तुझे आईपण




आभाळाएवढे उपकार तुझे
अखंड वाहता मायेचा झरा
तरी तहान इतकी की
तुझ्या मायेने भरलेली
ओंजळ माझी सदा
रिकामीच भासते गं आई।।
यशात माझ्या कौतुक बरसत
तुझ्या शदांत अभिमान दिसतो
पण अपयशातील बोल तुझे
खंबीर हात तुझे
जास्त आपलेसे वाटतात गं आई।।
श्रेष्ठ प्रेम तुझे
साऱ्या ब्रहांडात भरले
तरीही उरुन ते तुझ्या
कुशीत सामावले गं आई।।