आशेतली निराशा
आशेतली निराशा

1 min

48
मुळातच माणसाला मुळांचे नाही तर
बहरलेल्या वटवृक्षाचे आकर्षण जास्त असते,
आशावादी निराशावादी असा माणूस
नसतोच मुळी असते तर ती वेळ,
भातुकलीच्या खेळाप्रमाणे सुखद नसलेला
असा आशा निराशेचा खेळ सतत सुरु असतो,
मात्र वेळेच्या अंमलाखाली माणूस
इतका हरवून जातो कि निराशेनंतर आशा या चक्राचाच त्याला विसर पडतो,
आणि मग कधी खोल अंधारात
नैराश्येच्या चिखलात रुतत जातो,
तर कधी आपल्या वेळेचाच अंत करून घेतो..
वेळ मात्र तिची तिच्या वेगात धावत असते..