Lockdown उखाणे
Lockdown उखाणे


कोरोनामुळे आला मास्क।
मास्कमुळे आला लिपस्टिक कंपन्यांना घाम।
सौ... चा रूसवा काढणे एवढे एकच श्री... ना काम।
कोरोनाने मिळवून दिले सॅनिटायझरला महत्त्व।
जीवनाचे उमगले तत्व।
श्री... आणि सौ... आहे दोघे एकमेकांच्या
जीवनाचे सत्व।
वाढत चाललाय लाॅकडाऊन।
सोबत अहोंची नवीन पदार्थांची फर्माईश।
कितीही थकले हात... मन... तरीही
पूर्ण होत नाही श्री... ना तृप्त करण्याची ख्वाईश।
कोरोनाने पुरती उडवली धांदल।
सगळीकडे नुसतं लाॅकडाऊन
मास्क आणि क्वारंटाईन।
इश्श इथे श्री... चं सारखंच
सौ... इज माईन सौ... इज माईन।