STORYMIRROR

सईसाईशा Sarate-Kadam

Romance

3  

सईसाईशा Sarate-Kadam

Romance

मनातील रुक्मिणी

मनातील रुक्मिणी

1 min
47

तुझ्याशिवाय अपूर्ण मी, जशी बांसुरी तुझी।।

तरी पूर्ण करते तुला ती, असाह्य होते रीत ही।।

सांगतात सार्या हक्क प्रेमाचा, होते किंमत प्रेमाची।।

अमूल्य मात्र ठरते ती, असाह्य होते वेदना ही मनीची।।

ना प्राषले विष कधी, ना विझवले नेत्र कधी।।

भाग्य रेखांनी दोर बांधली, विराजली तुझ्या आसंदी।।

अपूर्ण तरीही राहिले, पूर्णत्व मात्र लाभले तिला।।

वेदना ही मनीची, सदा घायाळ करित राहते मला।।

कृष्ण तुझी रूक्मिणी नाही, राधा होऊ ईछिते मी।।                


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance