मातीची भेट सोनेरी
मातीची भेट सोनेरी
1 min
35
पेरीले बीज आशेचे
खत घातले मेहनतीचे
रोपण करता स्वप्नांचे
नजरा धावल्या निळाईकडे
भेगाळले कष्टकरी पाय
श्रमबिंदूनी मात्र आणला ओलावा
मेघांनी धरता आकार काळा
रिता झाहला उभा आसमंत
भेगाळलेल्या त्या पायातं
अंकुर आले फुलूनी
काळी माय झाहली पिवळी
देऊ केली धरित्रीने भेट सोनेरी