मी फक्त तुझी असेल
मी फक्त तुझी असेल
नाही झाले जरी बोलणे
नाही जरी झाली भेट
तरी सख्या आयुष्यभर
मी फक्त तुझी असेल
तुझ्या प्रत्येक श्वासात
काळजाच्या ठोक्यात
जाणवून बघ एकदा
तुला फ़क्त मीच भासेल
आठवण माझी येता
बंद करशील डोळे
नकळत तुझ्या समोर
तुला फक्त मीच दिसेल
एकटाच हसशील मग
बघून माझ्याकडे
तुझ्याकडे बघताना
लाजून थोडे मी ही हसेल
असेल जरी दुरावा
विसरेल कशी मी तुला
दिवस असा येण्याआधी
या जगात मी नसेल

