STORYMIRROR

Pandit Warade

Romance

4  

Pandit Warade

Romance

मी नसतांना

मी नसतांना

1 min
19.4K


दिलेत अश्रू भरभरून मज मी असतांना।

कशास आता अश्रू गाळता मी नसतांना ।।


आयुष्यामध्ये जळत राहिलो मी असतांना।

जळण्यास का आज निघाले मी नसतांना ।।


पोट भरून कधी नाही मिळाले मी असतांना।

बुंदी शिऱ्याच्या पंगती उठवा मी नसतांना।।


पायदळी मज नित्य तुडविले मी असतांना।

कशास आता पाया पडता मी नसतांना ।।


तुमच्या सुखस्ताव अशांत होतो मी असतांना ।

मम आत्म्याला शांती मागता मी नसतांना ।।


किती करावी उठाठेव ती जिवंत असता।

बिनकामाचे हिरेजवाहिर मी नसतांना ।।


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Pandit Warade

Similar marathi poem from Romance