मी कुणाला कळलो नाही
मी कुणाला कळलो नाही
मित्र कोण आणि शत्रू कोण,
गणित साधे कळले नाही.....
नाही भेटला कोण असा,
ज्याने मला छळले नाही.....
सुगंध सारा वाटीत गेला,
मी कधीच दरवळलो नाही.....
ऋतू नाही असा कोणता,
ज्यात मी होरपळलो नाही.....
केला सामना वादळाच,
त्याच्यापासून पळालो नाही.....
सामोरा गेलो संकटांना,
त्यांना पाहून वळलो नाही.....
पचवून टाकले दु:ख सारे,
कधीच मी होरपळलो नाही.....
मी कुणाला कळलो नाही.....
