STORYMIRROR

काव्य चकोर

Inspirational

4  

काव्य चकोर

Inspirational

मी घाबरतोय त्याला

मी घाबरतोय त्याला

1 min
217

तप्त सुर्यास डोक्यावर घेऊन

असंख्य प्रहार मनावर झेलत

तो अजूनही स्थितप्रज्ञ उभा आहे

ओरबाडले त्यास दुनयेने जरी

पोखरुन गेलय जर्जर शरीर तरीही

तो बोलत नाही कुणास काही..!!


एखाददुसरा कनवाळु जलद 

त्या वाटेने अवचित येतो कधीतरी

सावली धरु पाहतो त्यावर

पण कळेना कसला रोष त्याला

की सूर्यच त्यास वाटतोय बरा

असा फटकुन वागतोय तरी कोणावर..!!


मी विचारले त्याला 

काय झाले असे चिडायला

तुला आवडत नाही का भिजायला

बघ ना, त्या पानाफुलांना, वेली तरुंना

बघ त्या प्राणीमात्रांना, प्रत्येक माणसाला

किती आतुरलेत ते पाऊस झेलायला..!!


उत्तरला तो 

वाटते ना भिजावं मनसोक्त

अन् भिडावं मदमस्त वाऱ्याला

जिरवावे पाणी उदरात अन् वाट द्यावी झऱ्याला

पण हरवलीय माझी हरित छत्री

सांग कसा झेपवु मी पावसाला..??

घडेल एखादे माळीण पुन्हा

मी घाबरतोय मात्र त्याला..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational