STORYMIRROR

Dipaali Pralhad

Tragedy Others

4  

Dipaali Pralhad

Tragedy Others

मी गेल्यावर

मी गेल्यावर

1 min
583

मी गेल्यावर 

माझ्या आठवणींची  

मनात भीती वाटेल तुला ,

मग नकोस वाटेल तुझंच तुला ,


मी गेल्यावर ,

नुसताच दिवस उजाडेल अन रात्र सरेल ,

मध्यान्ह तुझी तडपत निघेल ,

अन सांज हि मेणासारखी वितळेल ,

  

मी गेल्यावर ,

कसे जगावे तुला कळणारच नाही 

रोज रोज त्या टांगत्या आरश्यात 

पाहिल्याशिवाय तुला जमणार नाही 


मी गेल्यावर , 

येतील अश्रू कोरडे विरत्या डोळ्यातून 

सारखे भास होतील माझे तुलाच 

तुझ्या कोरड्या उष्म श्वासातुन 


मी गेल्यावर ,

तू असाच काहीसा जगशील 

हजारो लाखोंच्या गर्दीत 

तू एकटाच राहशील ,



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy